दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये स्व.का.पांडे म.निवासी विद्यालयाचा सहभाग
पाचोरा- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा जळगाव आणि दिव्यांग शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावखेडा बुद्रुक जळगाव येथील जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्व.कालींदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील 13 स्पर्धकांनी या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यामध्ये 12 ते 16 या गटात 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये प्रमोद शांताराम काळे या स्पर्धकाने तृतीय क्रमांक मिळवला तर 12 ते 16 या गटात निवृत्ती दीपक पाटील या स्पर्धकाने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला तसेच बहु विकलांग प्रवर्गात आठ ते बारा या वयोगटात युवराज शिरीष पाटील या स्पर्धकाने लगोरी फोडणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील 13 क्रीडापटूंनी या जिल्हास्तरावर सहभाग नोंदवला यावेळी प्रथम आणि तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव प्रदीप पांडे आणि मीनाक्षीताई पांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा सुद्धा गुलाब पुष्प आणि बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेच्या तयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377