पाचोऱ्याची नवोदित चीत्रकारा दिव्या जैनचा सारंगखेडा अश्वचित्र स्पर्धेत ठसा उमटला
पाचोरा- सारंगखेडा येथील अश्वचित्र स्पर्धेत दिव्या जैन हिने काढलेल्या चित्राला ५ हजारांचे बक्षीस मिळाले आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे अश्वचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रिय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यातून सुमारे 800 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भाग घेतला होता. व आपले चित्र स्पर्धेसाठी पाठविली होती.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे सालाबाद प्रमाणे चेतक महोत्सव आयोजित होत असतो येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते येथील अश्व बाजार देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सुप्रसिध्द आहे. येथील भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय अश्वचित्र स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात पाचोरा येथील रंग श्री आर्टची विद्यार्थीनी दिव्या राहुल जैन हिने उत्कृष्ट व उत्तम आर्ट वर्क असे एक चित्र रेखाटले होते. सदर चित्राची पाहणी परीक्षक जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा.गजानन शेपाळ व नागपूर येथील प्रा. हेमंत सूर्यवंशी यांनी परीक्षण करून यातून दर्जेदार कलाकृती असलेल्या अडीचशे पेंटिंगची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली होती.यामध्ये पाचोऱ्याची दिव्या राहुल जैनची उत्कृष्ट आर्ट म्हणून निवड होऊन पाच हजार रुपये रोख रक्कम व शिल्ड,प्रमाणपत्र असे पुरस्कार तीस मिळाले.
दिव्या ही बालपना पासूनच कला क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत असून तिला कलाशिक्षक सुबोध कांतयान यांचे मार्गदर्शन लाभले असून तिला कला क्षेत्रात करीअर करावयाचे असून जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या नामांकित कॉलेज मध्ये कलाशिक्षण घ्यायचा मानस तिने बोलून दाखविला.ती पाचोरा येथील दुल्हन एम्पोरियम या दुकानाचे संचालक राहूल जैन व जयकिरण प्रभाजी इंग्लिश मेड.शाळेतील शिक्षिका पिंकी जैन यांची कन्या आहे.
तिने साध्य केलेल्या या यशा बद्दल नातेवाईक,मित्र परिवार पंचक्रोशीतील नागरिकांन कडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.