शेतातील उभे पिक जळायला लागल्या ने शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस चा महावितरण वर हल्ला बोल
पाचोरा,दि.2.जाने- पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ट्रान्सफार्मर साठी कॉंग्रेस ने आज महावितरण विभागावर हल्ला बोल केला. मागणी मंजूर केल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरण सोडले.
पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील शेतकरींचा ट्रान्सफार्मर गेल्या एक महिन्यापासून त्रास देत असल्याने विज पुरवठा सुरळीत होत नाही तर भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकरींचा ट्रान्सफार्मर गेल्या विस दिवसा पासुन जळाला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन देखिल दुर्लक्ष झाले त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांचे उभे पिक जळायले लागले आहे. आज पाचोरा महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी हल्ला बोल केला. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता श्री शिरसाठ यांनी निवेदन स्वीकारले आणि तात्काळ प्रश्न मार्गी लावला त्यामुळे सकाळ पासून शेतकरी ताटकळत बसले होते. प्रभारी कार्यकारी अभियंता श्री शिरसाठ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून तात्काळ मागणी मंजूर केल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरण सोडले यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, विठ्ठल पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, मधुकर पाटील, सारोळा बुद्रुक येथील शेतकरी रुपेश पाटील, रमेश भदाणे, संदीप भदाणे, जगदीश शेलार, शांताराम चौधरी, गणेश तायडे, नितीन पाटील, भरत महाजन, राहुल शिंदे, भागवत जगताप, गोकुळ पाटील, विठ्ठल शेलार, आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आंदोलना नंतर त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. शेतातील उभे पिक जळणार नाही याचे हायसे वाटत होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377