सिल्लोड येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते संपन्न
सिल्लोड– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांच्या विविध स्टॉल्सना भेट देत संवाद साधला.राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धतीकडे वळावे तसेच कृषी क्षेत्रात सुरू असलेले अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग व बदल त्यांच्यापर्यंत पोहचावेत यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन कृषी क्षेत्रातील अनेक नवीन संकल्पना जाणून घेतल्या.संपूर्णपणे वेगळ्या रंगाच्या कापसापासून तयार केलेला कोट यासमयी एका शेतकऱ्याने परिधान करण्यास दिला. तसेच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून जास्त उत्पादन घेण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या नवीन कल्पनांची माहिती देखील यावेळी जाणून घेतली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यादृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांनीही तृणधान्याची अधिकाधिक लागवड करावी यासाठी या कृषी प्रदर्शनात भर देण्यात आला आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377