पाचोरा, दि 31– येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये दि. २ जानेवारी व ३ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन – २०२२ – २०२३ “चला या नविन वर्षाचे स्वागत करु या”, “जुन्या स्वप्नांना पुन्हा नव्याने फुलवु या” चे आयोजन करण्यात आले असुन या स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिस वितरण व समारोप अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या समारंभाचे उद्घाटन धुळे येथील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते करण्यात येणार असुन अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन खलिल देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आ. दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, मानद सचिव महेश देशमुख, व्हा. चेअरमन विलास जोशी, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे उपस्थित राहणार आहेत.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये दि.२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जगदिश देवपुरकर यांच्या हस्ते होणार असून सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत रांगोळी, चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गीतगायन, सामुहिक नृत्य, नाट्यछटा, दि. ३ जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत अल्पोपहार, सांस्कृतिक कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस, गीतगायन, सामुहिक नृत्य, बालनाट्य व तदनंतर स्नेहसंमेलनाचा समारोप व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनास विशेष सहकार्य म्हणून सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील), दर्शन फॅशनचे ओम राठी, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संचालक संजय कुमावत, युनिक काॅम्प्युटरचे स्वप्निल ठाकरे, आशिर्वाद काॅम्प्युटरचे संचालक अतुल शिरसमणे, शितल अॅकेडमीचे रोहन पाटील, नेरीवाला ड्रेसेसचे रवि अग्रवाल, विजय ड्रेसेसचे अनुराग भारतीया, मे. पंडित अभिमनशेठ सराफ ज्वेलर्सचे जगदिश सोनार, वाघ डेअरीचे संचालक अश्विन वाघ, ओम हाॅस्पिटलचे अजयसिंग परदेशी, थेपडे बिल्डर्सचे संचालक अपुर्व थेपडे, ओमलक्ष्मी सिराॅमिकचे संचालक सुरज वाघ, गजानन डेकरीचे संचालक योगेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या दोन दिवशीय स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. गो. से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील, सांस्कृतिक प्रमुख आर. बी. तडवी, सर्व पर्यवेक्षक, हायस्कूलचे तांत्रिक विभाग, किमान कौशल्य विभाग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377