पाचोरा वकिल संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा अॅड.प्रविण पाटिल तर उपाध्यक्षपदी अॅड .मंगेश गायकवाड विजयी
पाचोरा, दि.5 — येथील पाचोरा तालुका वकील संघाच्या सण 2023 साठीच्या नूतन कार्यकारणी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया होऊन संघाच्या अध्यक्षपदी अॅड. प्रवीण पाटील यांनी २० मतांच्या आघाडीने तर उपाध्यक्ष पदासाठी अॅड. मंगेश गायकवाड यांची 22 मताच्या आघाडीने विजय मिळवला. तर सचिव पदासाठी अॅड. राजेंद्र पाटील व लायब्ररी सचिव पदासाठी अॅड. कालिदास गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पाचोरा वकील संघाची निवड प्रक्रिया ही सर्वांमध्ये बिनविरोध होत होती. मात्र यावर्षी ही प्रक्रिया बिनविरोध न होता लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रियेने झाली.या प्रक्रियेत चुरशीची अशी लढत होऊन अध्यक्ष पदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवड प्रक्रिया होताना २ उमेदवारांनी समोरासमोर लढत होत 49 विरुद्ध 69 अशी मतांची विभागणी होत अॅड. प्रवीण पाटील हे २० मतांच्या फरकाने निवडून आले. ते मागील सलग सात वर्षापासून अध्यक्षपदी आहेत. त्यांनी आपले नेतृत्व कायम ठेवले. तर उपाध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांमध्ये 48 विरूध्द ७० मते अशी मतदान झाले त्यात 22 मतांची आघाडी घेत अॅड. मंगेश गायकवाड यांनी ही निवडणूक जिंकली. निवड प्रक्रिया होण्याअगोदरच सचिव पदासाठी ॲड. राजेंद्र पाटील तर लायब्ररी सचिव पदासाठी अॅड. कालिदास गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. कार्यकारणी सदस्य पदासाठी अॅड. बी.जी. महाजन ,अॅड. वहाब देशमुख, अॅड. डी. आर. पाटील, अॅड.भिकुबाई पाटील व अॅड. भाग्यश्री महाजन यांची सर्वानुमती नियुक्ती करण्यात आली. निवड प्रक्रिया शांतते पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. रणसिंग राजपूत तर सहाय्यक म्हणून ॲड. गोपाल पाटील, ॲड. संजय देवगया, ॲड. कैलास सोनवणे, अॅड. मानसिंग सिध्दु यांनी सहकार्य केले. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377