पाचोरा, दि 4 – येथील गिरणाई शिक्षण संस्था द्वारा आयोजित अमोल भाऊ शिंदे चषक 2022 23 ही पाचोरा भडगाव तालुक्यातील अंतर शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. शिंदे इंटरनॅशनल स्कूल भडगाव रोड पाचोरा येथे दिनांक 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धेत घेण्यात आलेल्या 12 क्रीडा प्रकारात 2355 शालेय क्रीडापटूंनी सहभाग नोंदवला.
दिनांक 31 डिसेंबर रोजी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा स्पर्धेत चे उद्घाटन झाले. दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे व सचिव एडवोकेट जे.डी. काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी युवानेते अमोल भाऊ शिंदे यांनी तीन दिवसीय स्पर्धेचा आढावा घेताना, सर्व सहभागी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे कौतुक केले. तसेच यशस्वी आयोजनाबद्दल गिरणाई शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचारी वृंदांचे अभिनंदन केले. पाचोरा भडगाव तालुक्यातील क्रीडापटूंना स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पुढील वर्षापासून चॅम्पियनशिप ट्रॉफी आयोजित करण्याची संकल्पना बोलून दाखवली.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, जेसीस क्लबचे अध्यक्ष रोहित रीझाणी, माणिकराजे ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रविंद्र चव्हाण, पाचोरा क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, भडगाव क्रीडा समन्वयक डॉ. सचिन भोसले, रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. गोरखनाथ महाजन, भाजपाचे तालुका सरचिटणीस संजय पाटील, माजी प.स सभापती बन्सीलाल बापू पाटील, भाजपा ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस प्रदीप बापू पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील, माजी प स सदस्य ज्ञानेश्वर सोनार, संजय परदेशी प्राचार्य डॉ.विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र, रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
🟥 स्पर्धेची वैशिष्ट्ये
▪️ जिल्ह्यात प्रथमच खाजगी शिक्षण संस्थेकडून भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन
▪️ पाचोरा भडगाव तालुक्यातील 70 शाळांचा सहभाग
▪️ 845 मुली व 1510 मुलांचा सहभाग
▪️ क्रीडा स्पर्धेसाठी 54 पंच शिक्षकांचे परिश्रम
▪️ सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट
▪️ ३दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धांना अल्पोपहार मोफत
▪️ भव्य पटांगणावर स्वच्छता, शिस्त व अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन
▪️ गिरणाई शिक्षण संस्थेचे शिस्तबद्ध व सूत्रबद्ध आयोजन
🟥 असे होते क्रीडा प्रकार
◼️ आर्चरी
◼️ तायक्वांदो
◼️ टेबल टेनिस
◼️ बुद्धिबळ
◼️ कॅरम
◼️ बॅडमिंटन
◼️ कुस्ती
◼️ फुटबॉल
◼️ बास्केट बॉल
◼️ व्हॉलीबॉल
◼️ खो -खो
◼️ कबड्डी
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377