अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई – राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री श्री. लोढा यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुशीला कोळी, संघटनेचे सहाय्यक संघटक सुधीर परमेश्वर उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनस्तरावरून कार्यवाही करण्यात येत असून याबाबत शासन सकारात्मक आहे. या मागण्यांबाबत त्या त्या संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377