मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाचोर्यातील लोहारी येथील अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशनास हजेरी

पाचोरा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि ८.जाने रविवार रोजी तालुक्यातील लोहारी येथील अखिल भारतीय बडगुजर समाज मेळाव्याच्या समारोपासाठी उपस्थिती देऊन बडगुजर समाज बांधवांना संबोधित केले. यावेळी बोलतांना त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली. मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री आल्याने बडगुजर समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तसेच या अधिवेशनात ज्या काही मागण्या बाबत निवेदन देण्यात आले असेल त्याचा विचार केला जाईल व समाजास हॉस्टेल साठी मोठया शहरात जागेचा प्रश्न खूप मोठा नसल्याचे बोलून दाखविले .सी.एम म्हणजे कॉमन मॅन असून सर्वांचे कामे झाली पाहिजेत यावर आपला भर जास्त असला पाहिजे देवी,गणपती, दही -हंडी,दिवाळी असे अनेक सण हे कोरोना मुळे साजरे केले जात नव्हते परंतू आताचे सरकारने हे सर्व सण उत्साहात साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
मुख्यमंत्री येणार नाही असे सर्वांना वाटले होते परंतु आ.किशोर पाटील यांचे मतदासंघांतील या नियोजित कार्यक्रमास टाळणेही शक्य नव्हते, बडगुजर समाज लहान असला तरी काय पण एकजूट महत्वाची असते शिवाय आपण जो शब्द दिला तो कधीही फिरवत नाही ही देखील आपली परंपरा आहे आणि संघटित होण्यातच खरी ताकत असते.आम्ही जे सरकार स्थापन केले आहे हे ही त्याचेच प्रतिबिंब आहे असेही ते आपल्या भाषणातून बोलले
सत्तातंरच्या गुवाहाटी दौऱ्यातील आ.गुलाबराव पाटील यांची उपस्थिती व त्यातील गमतीशीर गोष्टींची सर्व माहिती मीडियाने दाखविलीच होती यावेळी उपस्थितांना हसू आले शिवाय राहिले नाही. शिवाय लहान खेड्या पासून ते देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या गोष्टीची दखल घेतली गेली व एकनाथ शिंदे या सर्व सामान्य कार्यकर्त्याला ओळख मिळाली मी सदैव सर्वसामान्य कार्यकर्ताच राहून जनसेवा करेल असे मत त्यांनी प्रकट केले आहे. जनतेचे काम करतो हेच आमची पोच पावती आहे सत्तेची हवा डोक्यात कधीही जाऊन देता मी सेवा देत राहील. ओबीसींसाठी असलेल्या विविध शासकीय योजनामधून आपल्या समाज बांधवांना,विद्यार्थ्यांना लाभ होईल शिवाय या गोष्टींसाठी विशिष्ट रकमेची तरतूदही करून ठेवलेली आहेच तरुणांना याचा नक्की लाभ होईल वसतीगृह, जिल्हा स्तरावर विषेश निधी, समाजास केंद्रात ओबीसी आरक्षण आदी महाअधिवेशनातील ठराव यावर सूचक वक्तव्य करीत समाजाने एकजुटीने राहून कार्य करावे हे सरकार आपलेच असून राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध आहे.
केंद्राने देखील विवीध योजनांसाठी निधी भरगोस दिला असून राज्य सरकारही विकासासाठी मागे हटणार नाही हे सरकार नाना विविध योजना राबवून राज्याची प्रगती करीत आहे.
आ.किशोरआप्पा.पा यांचे सारखे दमदार, कर्तव्य तत्पर, विकासाभिमुख नेतृत्व लाभल्यामुळे येथील विकास बघण्यासारखा असून भविष्यातही कमी पडणार नाही याची कल्पना त्यांनी आपल्या भाषणातून करून दीली आहे.

या दौऱ्याविषयी अनिश्चितता असल्याने तो रद्द झाल्याचे स्पष्ट झाले होते परंतु सकाळ पासून हा दौरा होणार असल्याची माहिती मिळतात युद्ध पातळीवर नियोजन करण्यात आले पाचोरा येथील एम एम कॉलेजच्या पटांगणावर हेलिपॅड तयार करण्यात आले होते याचे कामे पीडब्ल्यूडी अधिकारी व कर्मचारी वर्ग बघत होते. सदर दौऱ्यावेळी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.यावेळी प्रचंड जनसमुदाय हा येथे बघावयास मिळाला तदनंतर मुख्यमंत्री हे लोहारी येथील नियोजित मेळवण्यासाठी मार्गस्थ झाले.
मेळवण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ.किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ.चिमणराव पाटील, माजी आ.चंद्रकांत सोनवणे, मध्यप्रदेशाचे खा.ज्ञानेश्वर पाटील, अ.भा.बडगुजर समाजाचे अध्यक्षउमेश करोडपती,नरेंद्र बडगुजर पाचोऱ्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहील, जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, गणेश पाटील, सुनिल पाटील, सुभाष पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . या दौऱ्यास बाळासाहेबांची शिवसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी नेते पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना कार्यकर्ते यासर्वांनी कमी वेळात अथक परिश्रम घेऊन दौरा यशस्वी केला.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



