पाचोरा,दि 9 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा दिनांक 14 व 15 जानेवारी 2023 रोजी , “प्रभावी अध्यापन आणि शिकण्यासाठी ई-सामग्री निर्मिती” या विषयावर आयोजित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये आपणास प्रख्यात प्रशिक्षक श्री भूषण कुलकर्णी व श्री एकनाथ कोरे नॉलेज ब्रिज अहमदनगर हे आपणास परिपूर्ण प्रशिक्षण मराठी भाषेत देतील ज्याद्वारे विविध शैक्षणिक व्हिडिओग्राफी आपण वापरत असलेल्या अँड्रॉइड मोबाईल फोन द्वारे उत्कृष्टपणे निर्मिती करू शकाल.अँड्रॉइड ॲप द्वारे कशा प्रकारे प्रोफेशनल फोटोग्राफी व व्हिडिओ ,ऑडिओ एडिटिंग केली जाऊन दर्जेदार कंटेंट बनविता येते त्याच प्रमाणे कमी वेळेत कमी श्रमात अधिक प्रोफिटेबल काम होते.
कार्यशाळा मर्यादित सहभागींसाठी असल्यामुळे लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवावा व संबधित समन्वयकांशी कार्यशाळे विषयी माहिती घेण्यात यावी.
कार्यशाळा दिनांक 14 व 15 जानेवारी 2023 रोजी एस.एस.एम.एम कॉलेज येथील ठिकाण हॉल नंबर 25 महाविद्यालयतील मुख्य इमारत पाचोरा येथे होणार आहे याची नोंदणी फी १२००/- रुपये मात्र ( दोन दिवस सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, दुपारी चहा, सहभाग प्रमाणपत्र) अशी असून प्रशिक्षणाचे माध्यम मराठी आहे तरी ईच्छुकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहिती साठी पी.एम डोंगरे सरांशी सदर कॉलेज मध्ये संपर्क साधावा
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377