मुंबई, दि.10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे.
लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत -एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम (पुणे) यांना प्रथम प्रिया माकोडे (यवतमाळ) यांना द्वितीय पारितोषिक, बाळू बनसोडे (सोलापूर) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच, समूहांतर्गत ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच (जालना) यांना प्रथम शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील, खानदेश लोकरंग फाऊंडेशन, नगरदेवळा (जळगाव) यांना द्वितीय, तर शाहीर विनोद दिगंबर ढगे, दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था (जळगाव) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकल आणि समूह या दोन गटांतर्गत एकूण 68 प्रवेशिका आल्या होत्या. त्यांपैकी एकल गटात 34, तर समूहामध्ये 34 प्रवेशिका आल्या होत्या.
त्याचप्रमाणे, एकल आणि समूह या दोन्ही गटांतर्गंत एकूण 20 उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
अ. एकल गट – उत्तेजनार्थ : 1. श्रीकांत देवगोंडा मेडशिंगे (कोल्हापूर), 2. बालाजी महादेव जाधव (रायगड), 3. विनोद विद्यागर (मुंबई उपनगर), 4. अनंता अर्जुन मिसाळ (बुलढाणा), 5. शंकर नागनाथ कांबळे (सोलापूर), 6. महादेव तुकाराम भालेराव (बीड), 7. शहाजान सरदार मुकेरी (नाशिक), 8. धनश्री दिनेश जोशी (जळगाव), 9. जयश्री उदय पेंडसे (सांगली), 10. शिल्पा निनाद नातू (ठाणे).
आ. समूह गट – उत्तेजनार्थ : 1. शाहीर बजरंग शंकर आंबी (सांगली), 2. कविता विद्यागर (मुंबई), 3. अविष्कार विकास एडके (उस्मानाबाद), 4. अनुराधा गोपीनाथ कुलकर्णी, स्वरनिनाद ग्रूप, कोयना वसाहत कराड (सातारा), 5. सुरेश शंकर पाटील, आझाद हिंद शाहिरी पार्टी दिंडनेर्ली (कोल्हापूर), 6. प्रकाश गणपती लोहार, लोककला, कला, क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशिय मंडळ (कोल्हापूर), 7. उषा कमलाकर शेजुळे, शाहीर कमलाकर विठ्ठल शेजुळे आणि पार्टी , नवी मुंबई (ठाणे), 8. गणपत ना. तारवे, क्रांती कला मंच ,हातखांबा (रत्नागिरी), 9. शाहीर सुधाकर आरवेल, लोक कला पार्टी (मुंबई), 10. शंकर महादेव दवले (कोल्हापूर).
एकल गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 7 हजार , 5 हजार आणि 3 हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त 10 विजेत्यांना प्रत्येकी 500 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
समूह गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार रुपये, 11 हजार रुपये आणि 5 हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम संगीत विशारद पुंडलिक कोल्हटकर आणि नृत्य कलावंत डॉ.सान्वी जेठवाणी यांनी पाहिले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377