चाळीसगावच्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत विजयी भैय्यासाहेब पाटील यांचा सत्कार
पाचोरा – चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत डॉ. विनायक चव्हाण यांच्या य.ना. चव्हाण स्मृती पॅनलने बाजी मारली असून खासदार उन्मेष पाटील यांचे पिताश्री भैय्यासाहेब पाटील हे डॉ. चव्हाण यांच्या पॅनल कडून मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत झालेल्या सत्तांतराचे शिल्पकार म्हणून भैय्यासाहेब पाटील यांना ओळखले जात आहे.
प्राचोरा तालुक्यातील शैक्षणिक संस्थांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात चाळीसगाव रा. वि. चे नवनिर्वाचित नेतृत्व भैय्यासाहेब पाटील यांचा आज चाळीसगाव येथे पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, माणिकराजे ट्रस्ट- नगरदेवळा चे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण, संस्थेचे वरीष्ठ लिपिक श्री शिवाजीराव बागुल, ज्येष्ठ शिक्षक श्री जयदीप पाटील यांनी भैय्यासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377