ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ३० दिवसांत खर्चाचा तपशील सादर करावा
जळगाव, दि.14 – जिल्ह्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणा-या 140 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर 2022 रोजी पार पडली आहे. या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ब) अन्वये बंधनकारक आहे. तरी सर्व निवडणूक लढविण्यात आलेल्या उमेदवार व सरपंच यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर करावा. असे आवाहन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
जळगाव जिल्ह्यात निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती संख्या 140, सरपंच व सदस्यांच्या एकूण जागा 1348, बिनविरोध झालेले उमेदवार 431, निवडणूक लढविलेले उमेदवार 2555, खर्चाचा हिशोब देण्याचा अंतिम दिनांक 19 जानेवारी, 2023 आहे. असेही उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377