पाचोरा,दि.18 – येथील पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हा रन.96/2018 भादवी कलम 326,324, 323, 504, 506,34 मधील आरोपी 1.दिपक हिरालाल भदाणे, 2.वाल्मीक भदाणे दोन्ही रा. बांबरुड राणीचे ता.पाचोरा जि.जळगाव यांना आज रोजी मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो पाचोरा श्री जी बी औंधकर साहेब यांनी सदर गुन्ह्यात दोषी ठरवीले असुन भादवी कलम 326 मध्ये 3 वर्ष सश्रम कारावास, 324 मध्ये 2 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 03 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधिक्षक सो जळगाव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो चाळीसगांव तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा, प्रभारी अधिकारी पाचोरा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली कै. सफौ. 1346 हिरामण चौधरी यांनी केला असुन सरकारी अभियोक्ता श्री. रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले आहे तर आरोपी पक्षा तर्फे अँड एस.पी पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ. 920 दिपक प्रकाश पाटील व कोर्ट केसवाच म्हणुन पोना. 2903 विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377