पाचोरा – नुकत्याच पार पडलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधीसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून विलास त्र्यंबक जोशी, नंदकुमार बेंडाळे ,संजय पाटील, निशांत रंधे , हे निवडून आले आहेत. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक यावर पाचोरा तालुका शिक्षण सहकारी संस्था येथील व्हाईस चेअरमन श्री विलास त्रंबक जोशी सर हे निवडून गेले आहेत यावेळी सर्वप्रथमच त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन ते निवडूनही आले आहेत या यशामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटी येथील संस्थेचे सह सचिव, महाविद्यालय कमिटी आदींवर जोशी सर काम बघत असताना अनेक कामे त्यांनी केलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान हे फार मोठे आहे, त्यांचा गाढा अभ्यास आहे.त्यांचे कार्य फक्त तालुका पुरता मर्यादित नसून सबंध विद्यापीठ तसेच महाराष्ट्रातील इतर शैक्षणिक संस्थांमधून वेळप्रसंगी त्यांचे मार्गदर्शन अनेक संस्था चालक घेत असतात एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व पिटीसी संस्थेला लाभलेले असून याचा फायदा विद्यापीठ व्यवस्थापन समितीलाही होणार यात काही शंका नाही महाविद्यालयातील अनेक समस्यांना आता वाचा फोडण्याचे काम तसेच विद्यार्थी ,प्राध्यापक, कर्मचारी यांच्या अडीअडचणी व्यवस्थापना संदर्भात असलेले महाविद्यालयीन कामकाज आदीबाबत आता विद्यापीठात अशा अनेक समस्यांचे निराकरण त्यांचे मार्फत झाल्या शिवाय राहणार नाही अशी अपेक्षा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालयातील प्राचार्यांनी तसेच संस्थाचालकांनी बोलून दाखविले आहे. प्रत्येकाला सहकार्य करण्याची त्यांची भावना अनेक जटील समस्या त्यांचे निराकरण हे जोशी सरांमार्फत होत असते.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, चेअरमन नानासो.संजय वाघ, सचिव ॲडवोकेट महेश देशमुख यांनी अभिनंदन केलेले असून या निवडीबाबत महाविद्यालयातील प्राचार्य ,उपप्राचार्य ,कर्मचारी वर्ग शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा व अभिनंदना सह त्यांचे जंगी स्वागत करून या विजयासह त्यांचाही आनंद द्विगुणीत केलेला आहे.तसेच परिवारातूनही या विजयाचा आनंद सोहळा साजरा केला गेला.
प्रथमतः निवडणूक लढवून त्यात विजयी झाले असून ही सर्वांची मेहनत व सहकार्य असल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे असे प्रतिपादन त्यांनी अभीनंदन सोहळ्यावेळी केले त्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन फटाक्यांच्या आतिषबाजीत कर्मचारी वृंद व सहकाऱ्यांनी या विजयाचा जल्लोत्सव साजरा केला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377