नाशिक विभागात लोकसहभागातून 6 हजार 134 बंधारे पूर्ण, 12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील पिके ओलीताखाली येणार
नाशिक:-पारंपरिक पद्धतीने पाणी अडवून पाण्याचा साठा करुन बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी पुरविणे खूप गरजेचे असून त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, गुरांना पिण्याकरिता, कपडे धुण्याकरिता, वनराई बंधाऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते. तसेच वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला,कडधान्य, कलिंगड, तृणधान्य, गळीत धान्य सारखी पिके घेण्यासाठी मदत होते.
नाशिक विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून विभागात लोकसहभागातून 6 हजार, 134 बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण 1227 टी.सी.एम.जलसाठा अडविला असून 12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे. एका वनराई बंधाऱ्याद्वारे सरसरी 2 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय अधीक्षक कृषि अधिकारी तथा विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली
नाशिक विभाग राज्यात प्रथम
विभागात आजपर्यंत नाशिक 3 हजार 755, धुळे 608, नंदूरबार 1 हजार 340, जळगाव 431 असे एकूण 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहेत. राज्यात नाशिक कृषि विभागाने सर्वात जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून व लोकसहभातून पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377