आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन


जळगाव,दि.22 :-सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने यांनी त्यांच्याकडील माहे 31 डिसेंबर, 2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) 28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. असे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र सादर/अद्ययावत करणे बंधनकारक आहे. याअनुषंगाने माहे 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता (Employer) या मथळयावर क्लिक करुन आपल्या नियोक्ता लॉग-इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने 28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी कळविले आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\