आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा येथे पोस्टर प्रदर्शनातून स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा

पाचोरा-15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या पाऊल खुणा या विषयावर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध घटना संबंधी 100 पोस्टर प्रदर्शित करण्यात आले यामध्ये परकीय सत्तेचे भारतातील आगमन प्लासी,बक्सार,1857 चा उठाव ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मवाळ,जहाल गट,जालियनवाला बाग हत्याकांड,असहकार चळवळ,सायमन कमिशन,सविनय कायदेभंग चळवळ,म.गांधी आयर्विन करार, राजा राममोहन रॉय,म.ज्योतीबा फुले,सावित्रीबाई फुले,लो.टिळक,महात्मा गांधी,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुणे करार,छोडो भारत चळवळ,क्रिप्स योजना,स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर,शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पं.मोतीलाल नेहरू,पं.जवाहरलाल नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद,लाला लजपत राय,सरदार वल्लभभाई पटेल,बिर्सा मुंडा,बाबू गेणू,शिरीषकुमार ते भारतीय स्वातंत्र्यलढा आणि खानदेश,साने गुरुजी,डॉ उत्तमराव पाटील,लीलाताई पाटील साताऱ्याचे पत्रीसरकार क्रांतिसिंह नाना पाटील,लाला हरदयाळ अशा विविध सामाजिक राजकीय विचारवंत नेते क्रांतिकारक यांच्या जीवन चरित्र व कार्याचा आढावा पोस्टर प्रदर्शनातून मांडण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.भाऊसाहेब दिलीप वाघ तसेच संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्याही शुभेच्छा मिळाल्या कार्यक्रम प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन नानासाहेब सुरेश जी देवरे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.बी एन पाटील प्राचार्य डॉ.शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले उपप्राचार्य डॉ.जे व्ही पाटील उपप्राचार्य प्रा.जी बी पाटील प्रा.राजेश मांडोळे प्रा.एस एस पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमाची मूळ संकल्पना प्रा.डॉ.माणिक पाटील यांची होती तर यासाठी इतिहास विभाग प्रमुख प्रो.डॉ.जे.डी गोपाळ यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी वरिष्ठ,कनिष्ठ व किमान कौशल्य विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रथम,द्वितीय तृतीय वर्ष इतिहास वर्गातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!