पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे स्व द. मु.परांजपे ,स्व बाबूभाई रावल, माजी आमदार स्व. सु.भा. पाटील, माजी मंत्री स्व.के. एम. पाटील, माजी आमदार स्व. आप्पासाहेब वाघ,स्व. अँड. आर.एस. थेपडे,स्व अँड वाय बी शर्मा, स्व अँड एस आर देशमुख यांच्या स्मृतीनिमित्त एम. एम. महाविद्यालयात सिने अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड यांचे ‘मला भेटलेल्या लेकी व सुना’ या विषयावर झालेल्या व्याख्यानास महिलांसह श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानास संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव अँड महेश देशमुख, दगाजी वाघ, खलील देशमुख, नाना देवरे, सतीश चौधरी, प्राचार्य डाॅ शिरीष पाटील,डॉ बी एन पाटील,डाॅ एन एन गायकवाड, भूषण वाघ, आकाश वाघ, विकास पाटील, नितीन तावडे ,नानासाहेब देशमुख, योगेश पाटील ,वासुदेव महाजन, भागचंद राका, सिताराम पाटील, बाळकृष्ण पाटील, विजय देशपांडे, चंद्रकांत येवले,प्रा भागवत महालपुरे, हारुण देशमुख, सुचिता वाघ, ज्योती वाघ आदी उपस्थित होते.
माजी दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. या प्रसंगी संस्थेच्या वतीने डॉ निशिगंधा वाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या व्याख्यानात डॉ निशिगंधा वाड यांनी साकारलेल्या विविध ऐतिहासिक भूमिकांमधील महिलांचे स्थान स्पष्ट केलेव ईतिहासाची पाने उलगडली. मनातील भय काढले तर भविष्यकाळ जिंकता येतो. आपण ज्या वातावरणात राहतो तोच आपला खरा गुरु असतो. प्रगती झाली असली तरी नाती अलीकडच्या काळात दुरावली आहेत. तरुण पिढी आनंदाकडे पाठ फिरवते. जीवनातील सुखद सौंदर्य अनुभवा, नाती जपा. मनुष्य जन्माचा आनंद लुटा. स्वतःशी स्पर्धा करा असे मत मांडले. प्रश्नोत्तर कार्यक्रम चांगलाच रंगला. चेअरमन संजय नाना वाघ यांनी प्रास्ताविक केले. महेश कौडीण्य सर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्राध्यापक माणिक पाटील सर यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377