आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

श्री.गो.से.हायस्कूल,पाचोरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.


पाचोरा,दि 4- पा.ता.सह. शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन खालील देशमुख,प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.प्रा. राजेंद्र चिंचोले हे उपस्थित होते.
संगीत शिक्षक सागर थोरात व रुपेश पाटील यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.मुख्याध्यापिका, उप मुख्याध्याप व पर्यवेक्षक यांच्या हस्ते वरील मान्यवरांचा शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ यांनी आपल्या प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांना कठोर मेहनतीतून यश संपादन करण्यास सांगितले.तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.श्री. राजेंद्र चिंचोले यांनी इयत्ता दहावी नंतर फक्त विज्ञान शाखेचा आग्रह न धरता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्या संदर्भात तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात खलील देशमुख यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मुली व महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त,संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.शाळेचे उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील ,पर्यवेक्षक आर.एल. पाटील .ए. बी.अहिरे कार्यालयीन प्रमुख .अजय सिनकर,सांस्कृतिक उपविभाग प्रमुख आर. बी. बोरसे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख . आर. बी.तडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन . एम. एन.देसले यांनी केले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\