जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला अपघात सर्व यात्रेकरू सुखरूप
जळगाव, दि 5 – जळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेली ट्रॅव्हल बस क्रमांक (GJ05Bx3438) ओडिसा राज्याच्या सीमेजवळील सोहला गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी असताना बसला सिमेंटच्या गोण्या भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. शनिवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. या अपघातातील जळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत.
जळगाव येथून गुजरातमध्ये नोंदणी असलेल्या गंगोत्री ट्रॅव्हल्स द्वारा आसाम, नेपाळ, गंगासागर जगन्नाथ पुरी, उज्जैन, वाराणसी, कामाख्या देवी या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी जळगाव येथून एकूण 49 भाविक गेले आहेत. या भाविकांमध्ये नेपानगर येथील 7, औरंगाबाद 4, पुणे 2, मुंबई 2, सोलापूर 2 आणि जळगाव जिल्ह्यातील 31 प्रवासी होते. यापैकी जिल्ह्यातील सर्व यात्रेकरी सुखरूप असून श्रीमती मंगलाबाई पाटील, बळीराम पेठ, जळगाव यांना किरकोळ दुखापत झालेली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेशी संपर्क साधून माहिती दिली. पालकमंत्री श्री. पाटील त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, जळगाव यांना सदर घटनेबाबत माहिती देऊन अपघातग्रस्त नागरिकांना मदत कार्य करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी, जळगाव यांनी त्वरीत संबलपुर जिल्हाधिकारी आणि बारलगढ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व
अपघाग्रस्तांना मदत कार्य करणेबाबत सूचित केले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने सर्व अपघातग्रस्त नागरिकांना स्थानिक शासकीय रुग्णालयात हलवले व किरकोळ जखमी असलेल्यांवर उपचार केले आहेत.
यात्रेच्या आयोजक शोभा पाटील (राहणार जळगाव) या जिल्हा प्रशानाच्या सूचनेनुसार रात्रीच संबलपूर येथे रवाना झाल्या असून सर्व यात्रेकरूंना संबलपूर प्रशासनाच्या मदतीने जळगाव येथे सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257-2217193/2223180 अथवा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मोबईल क्रमांक 9373789064 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377