पूर्वसंमती प्राप्त शेतकऱ्यांनी काम पूर्णत्वाचे बील पोर्टलवर अपलोड करावे
जळगाव, दि.6 :- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पात फळबाग लागवड योजनेतंर्गत पूर्वसंमती प्राप्त झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप काम पूर्णत्वाचे बील दाखल केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारी, 2023 पर्यंत काम पूर्णत्वाचे बिल (payment request raise) डिबीटी पोक्रा पोर्टलवर अपलोड करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंमलबजावणी कालावधी माहे जून 2024 अखेरपर्यंत आहे. सन 2022-23 मधील फळबाग लागवड घटकांसाठी अर्ज करण्याची मुदत माहे सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत आणि प्रत्यक्ष लागवड माहे नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रकल्प क्षेत्रात खरीप हंगामात वाढलेला पावसाचा कालावधी विचारात घेऊन दिनांक 30 सप्टेंबर, 2022 अखेर पर्यंत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या फळबाग लागवड, वानिकी आधारीत वृक्ष व बांबू लागवड घटकांसाठी प्रत्यक्ष लागवडीकरीता दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
तरीर आता पूर्वसंमती प्राप्त शेतकऱ्यांपैकी ज्यांनी अजूनही काम पूर्णत्वाच्या बीलाची मागणी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना दिनांक 15 फेब्रुवारी, 2023 पर्यंत काम पुर्णत्वाचे बिल डिबीटी पोक्रा पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना प्रकल्प संचालक, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, नादेकृसंघ, मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड, वानिको आधारीत वृक्ष व बांबू लागवड या बाबीकरीता पूर्वसंमती मिळाली आहे. अशा शेतकऱ्यांनी काम पूर्णत्वाचे बिल पोर्टलजवर अपलोड करावे, असेही श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377