जळगाव येथे राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न
जळगाव, दि. 6 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव, जिल्हा परिषद व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने 1 ते 3 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे पार पडल्या,
या स्पर्धेचा समारोपप्रसंगी तहसिलदार पंकज लोखंडे, पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले, सॉफ्टबॉल संघटनेचे प्रदीप तळवेलकर, सॉफ्टबॉल संघटनेचे कार्याध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, इकबाल मिर्झा आदि मान्यवर उपस्थित होते.
सॉफ्टबॉल स्पर्धेचा अंतिम निकाल – मुलांच्या गटामध्ये नाशिक विभागाने प्रथम क्रमांक, लातूर विभागाने व्दितीय क्रमांक तर पुणे विभागाने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच मुलींच्या गटामध्ये कोल्हपूर विभाग प्रथम, नाशिक विभाग व्दितीय तर लातूर विभागाने तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेकरीता पंच म्हणून गौरव चौधरी, पपेश चाव्हाण, प्रज्वल जाधव, अक्षय येवले, अर्जुन राठोड, हरिओम त्रिपाठी, उमेश विसपुणे, पियुष चांदेकर, मोहित पाटील, कल्पेश कोल्हे, प्रतिक देशमुख, वैभव बारी आदिंनी काम पाहिले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377