जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे
जळगाव,दि.7 :- स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दीगंत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र, जळगाव व जिल्हा प्रशासन, जळगावव्दारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात चित्रकला कार्यशाळा व स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा व स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जळगाव नरेंद्र डागर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता स्पर्धक हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा. स्पर्धेकाचे वय दि. 1 एप्रिल, 22 रोजी 15 ते 29 पर्यंत असावे. एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल, विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस रुपये एक हजार, व्दितीय 750 रुपये तर तृतीय 500 रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस पाच हजार रुपये, व्दितीय 2 हजार रुपये, तृतीय 1 हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र. जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समूहाकरीता) एका ग्रुप मध्ये कमीत कमी 5 जास्तीत जास्त 20 स्पर्धक असावे. प्रथम बक्षिस 5 हजार रुपये, व्दितीय 2500 रुपये, तृतीय 1250 रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/289521GyugghSDk99 या लिंकवर 15 फेब्रुवारी, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. ज्या सहभागींनी अगोदर नोंदणी केलेली आहे, त्यांना नोंदणी करण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र गट नं. 40, प्लॉट नं. 60, द्रौपदी नगर, जळगाव-425001 फोन नं. 0257-2951754 ईमेल: qnykjalgaon@gmail.com वर संपर्क साधावा असे श्री. डागर यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377