शेतकऱ्याची लुट करणारा २ वर्षा पासुन पाहिजे असलेला आरोपी अखेर केला जेरबंद.

जळगाव – भडगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १०४/२०२१ भादंवि क. ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर
गुन्हयांत आरोपी निष्पन्न झाल्यानंतर शहारुख रज्जाक तडवी वय २५ रा. कोल्हे ता.पाचोरा हा गुन्हयांत अटक नव्हता. तो सदर गुन्हयांत अटक चुकवित होते. सदर बाबत मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव,
श्री. अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधीक्षक, चाळीसगाव उपविभाग यांनी श्री. किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना अटक
करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे श्री. किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी आरोपीतांची
माहिती काढली असता आरोपी शहारुख रज्जाक तडवी वय २५ रा. कोल्हे ता.पाचोरा हा पिंपळगाव हरे ता.पाचोरा
गावात आला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पोहेकॉ/ लक्ष्मण अरुण
पाटील, पोना/रणजित अशोक जाधव, पोना/किशोर ममराज राठोड, पोना/श्रीकृष्ण खंडेराव देशमुख अशांचे पथक
तयार केले. त्यांना पिंपळगाव हरे ता. पाचोरा गावी पाठविले. वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी पिंपळगाव
हरे गावात आरोपीचा शोध घेवून त्यास चारही बाजुने घेरुन शिताफीन ताब्यात घेतले. तसेच भडगाव पोलीस
स्टेशन गु.र.नं. १०४/२०२१ भादंवि क. ३७९, ३४ या गुन्हयांत भडगाव पो.स्टे. ला हजर केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



