महिला लोकशाही दिनाचे 20 फेब्रुवारीला ऑनलाईन आयोजन
जळगाव,दि.13- जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, 20 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.
समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन ऑनलाईन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होईल.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी याप्रमाणे आहेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसीलदार, जळगाव- tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार, जामनेर- tah.jamner@gmail.com, तहसीलदार, एरंडोल-erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार, भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार, धरणगाव- dharangaon2014@gmail.com, तहसीलदार, बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार, यावल- tyawal@gmail.com, तहसीलदार, रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार, भडगाव- tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार, चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com, तहसीलदार, अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार, पारोळा- parolatahsil@gmail.com, तहसीलदार, पाचोरा- tahsilpachora@gmail.com, तहसीलदार, मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com, तहसीलदार, चोपडा- tahsidarchopda@gmail.com.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377