संतांचे कार्य सामान्यांच्या उद्धारासाठी : पाचोरा येथील संयुक्त जयंती मधील विचारांचा सूर
पाचोरा,दि १५ :- येथील महापुरुष सन्मान समितीतर्फे संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज व मासाहेब रमाई यांची संयुक्त जयंती आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हुतात्मा स्मारक सभागृहात संपन्न झाली. या जयंतीनिमित्त झालेल्या मनोगतातुन महापुरुषांचे व संतांचे कार्य हे जनसामान्यांच्या उद्धारासाठीच आहे- असा सूर व्यक्त करण्यात आला.
या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मासाहेब रमाई, संत सेवालाल महाराज, व संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. “समाजात काम करणाऱ्या व चळवळीत काम करणाऱ्या विविध समाजातील कार्यकर्त्यांनी आपापल्या युगपुरुषांना व त्यांच्या विचारांना स्वतःच्या स्वार्थासाठी वाटून न घेता, या सर्व महान राष्ट्रपुरुषांचे समग्र विचार एकसंघ पद्धतीने समाजात रुजवण्याचे कार्य करावे. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील संत व महापुरुषांनी त्या -त्या काळाच्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून जनतेला वैचारिक ज्ञान व जीवन जगण्याच्या कानमंत्र दिला. स्वतः प्रचंड हाल-अपेष्टा व कष्ट सहन करून सामाजिक विकासाच्या विचारांची पेरणी या महापुरुषांनी केली. आपल्या सर्व महापुरुषांचे व संतांचे कार्य जनसामान्यांच्या उद्धारासाठीच आहे” – असा सूर या संयुक्त जयंती जयंतीत व्यक्त करण्यात आला.
नवजीवन विद्यालयाचे अध्यक्ष राजू राठोड कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. पवार, प्रमुख वक्ते सुनील शिंदे, किशोर डोंगरे, विकास पाटील, एस. ए. पाटील सर, यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, मुकेश तुपे, आनंद नवगिरे, अनिलआबा येवले, अनिल लोंढे, मराठा महासंघाचे सरचिटणीस राहुल आप्पा बोरसे, अनिल सावंत, निलेश पाटील, शशिकांत मोरे, दीपक आदिवाल, भैय्या सावळे- आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. किशोर डोंगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. नगरसेवक विकास पाटील यांनी आभार मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377