पाचोरा- डॉ. विजय पाटील फाउंडेशन नाशिक आयोजित PMEE -(Pre Medical Entrance Exam)मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलCBSE मध्ये नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ. विजय पाटील फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने PMEE(Pre Medical Entrance Exam 2021-22 चे आयोजन करण्यात आले होते, या परीक्षेत पाचोरा येथील विविध शाळांमधील एकूण 300 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात इयत्ता दहावीचे दोन विद्यार्थी श्रुतिका तेली व मोहित निंबाळकरया दोन विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांना दिनांक 14 /02/ 2023 रोजी शिंदे इंटरनॅशनल स्कूल CBSE पाचोरा येथे शिक्षण संस्थेचे संस्थापकिय अध्यक्ष मा.तात्यासाहेब श्री. पंडितराव शिंदे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरावण्यात आले. सदर विद्यार्थ्याना सहसचिव प्रा. श्री. शिवाजी शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉक्टर विजय पाटील सरांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना उपाध्यक्ष सौ.किरण विजय पाटील, सरचिटणीस डॉ .मृण्मयी पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. परीक्षा यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या शिक्षिका सौ. सविता पाटील व सौ. वर्षा देशमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्षंदा चौधरी मॅडम यांनी केले. परीक्षा व कार्यक्रम सु व्यवस्थित होण्यासाठी संस्थेच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. डॉक्टर विजय पाटील सरांच्या या दूरदृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना पाचवीपासूनच NEET, व JEE परीक्षा देण्याचा सराव शाळेतून मिळत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377