आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आपला जिल्हा
Trending

हतनुर धरणाच्या जलाशयावर आयोजित आशियाई पाणपक्षी गणनेत 149 पक्षी प्रजातींची नोंद


जळगाव, दि.14 :- वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर व चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हतनुर धरणाच्या जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना 12 फेब्रुवारी, 2023 रोजी पार पडली. या पक्षी गणनेत जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर कृपाली शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, शिल्पा गाडगीळ, उदय चौधरी, सौरभ महाजन, सत्यपालसिंग, समीर नेने, संजय नेने, राहुल चव्हाण, पार्थ बऱ्हाडे यांचेसह 35 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला असे उपवनसंरक्षक श्री. होशिंग यांनी कळविले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या पाणपक्षी गणनेच्या दिवशी 149 पक्षी प्रजाती आढळून आल्या. त्यामध्ये हतनूर धरणाचे मानचिन्ह असलेले मोठी लालसरी, त्याचप्रमाणे वारकरी, वैष्णव, तलवार बदक, शेंडी बदक, भिवई बदक, दलदली हरीण पक्षी, ठिपकेदार होला इ. पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून आले.
चांगदेव, खामखेडी, मेहून, चिंचोल, हतनूर, तांदलवाडी या 5 ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. हतनूर धरण परिसरातील नदीपात्रात बोटींमधून भ्रमंती करून दुर्बीण व कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्थलांतरित देशी-विदेशी पक्षांचा अभ्यास केला गेला. देश-विदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची मोठी संख्या पाहता हतनूर धरण जलाशयास ‘महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र’ (IBA) हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\