महाराष्ट्र
कृष्णा सागर बहुळा धरणावरील ‘कृष्णापार्क’ प्रकल्पाचे सोमवारी भूमिपूजन.

पर्यटन विकासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करत आमदार किशोर अप्पा पाटील यांची वचनपूर्ती
पाचोरा दि,१९-माजी मंत्री स्व.के एम बापू पाटील यांच्या सन्मानार्थ पाचोरा तालुक्यातील बहुळा मध्यम प्रकल्पाचे नामकरण कृष्णा सागर केल्यानंतर आता या ठिकाणी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून “कृष्णा पार्क” या अत्याधुनिक पर्यटन पूरक प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवारी सकाळी दहा वाजता होणार असून यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विकास निधीतून आमदार किशोर अप्पा पाटील यांनी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यानिधीतून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कृष्णा पार्क मध्ये निसर्गरम्य घाट,बगीचा,प्रशस्त बैठक व्यवस्था आदी कामे होणार असून संपूर्ण परिसर पर्यटन केंद्राच्या अनुषंगाने विकसित करण्यात येणार आहे.या कामाच्या निमित्ताने आमदार किशोर अप्पा पाटील यांनी वचनपूर्ती केल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी पी सोनवणे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल,कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार येळाई,तहसीलदार कैलास चावडे,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे पदमसिंग पाटील ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, शहर प्रमुख किशोर बारावकर ,बंडू चौधरी,उद्योजक मुकुंद बिलदीकर,माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील,माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, बाजार समितीचे माजी प्रशासक चंद्रकांत धनवडे,पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील,अनिल पाटील,राजेंद्र तायडे,माजी नगरसेवक डॉ भरत पाटील,भाजपाचे माजी शहर प्रमुख नंदू सोमवंशी,युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील,सुभाष तावडे,माजी नगरसेवक नासिर बागवान,अय्युब बागवान, प्रवीण ब्राह्मणे,इंदल परदेशी,भय्यासाहेब पाटील,संजय देवरे यांची उपस्थिती राहणार असून बिलदी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थांचे या कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य लाभत आहे. तरी परिसरातील सर्व ग्रामस्थ बांधवानी कार्यक्रमास उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



