जिल्ह्यात 40 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण
जळगाव,दि.4 : समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या 40 कोटी रुपयांच्या 901 कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक यांना वितरीत करण्यात आले.
येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले शासकीय प्रशिक्षण संस्था, नागपूर यांनी आयोजित केलेल्या निंबध स्पर्धेत सन २०२०-२१ मध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळवून कु. माधुरी सुनिल पाटील यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर संविधान दिनानिमित्त महाज्योती, नागपूर यांनी आयोजित केलेल्या राज्य निबंध स्पर्धेत भाग घेतला व त्यात राज्यातून तृतीय क्रमांक मिळविला आहे त्यांना त्यांचे बँक खात्यात रोख स्वरुपात ३० हजार व सन्मानचिन्ह महाज्योती, नागपूर यांचे कडून देण्यात आले. त्याचे वाटप आज करण्यात आले.
त्याचबरोबर इ. १० वीच्या परीक्षेत ६०% पेक्षा जास्त मार्क मिळवून उतीर्ण झालेले व पुढील वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण असे घेता यावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७९४ विद्यार्थांना टॅब (टॅबलेट संच) प्राप्त झाले आहेत. त्यातील कु. आंकाक्षा साहेबराव पाटील, चि. पराग गणेश पाटील, चि.वेन्दात विनोद पाटील यास महाज्योती कडून प्राप्त 3 विद्यार्थ्याना प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्री यांचे हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदि उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377