आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा’ गावात स्वच्छता व कामकाजात पारदर्शक महत्वाची-पालकमंत्री गुलाबराव पाटील


ग्रामविकासात ग्रामसेवकांचे योगदान महत्वाचे-ग्रामविकासमंत्री महाजन


जळगाव,दि.4: ग्रामसेवक हे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम करीत असल्याने ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. ग्रामसेवक व सरपंचांनी कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील नियोजन सभागृहात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यावतीने आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ व सुजल, समृध्द जळगाव अभियान (डासमुक्त जळगाव) शुभारंभयाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन हे होते. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, संजीव निकम, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका मोलाची असते. यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामविकासाच्या योजना आखताना सर्वसामान्य नागरीक नजरेसमोर ठेवून विकास कामे करावी. विकासकामांचा दर्जा चांगला राहील यावर भर देतानाच गावाचा कारभारही पारदर्शक राहिला पाहिजे. ग्रामसेवकांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. यापुढील काळातही अधिकाधिक चांगल कामे आपल्या हातून घडावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थीची जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगून आपण करीत असलेल्या कामाचे आपल्याला समाधान वाटले पाहिजेत असे काम सर्वांच्या हातून घडावे. जळगाव जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, ग्रामसेवक व तलाठी ही ग्रामीण भागाच्या विकासाची दोन चाके आहेत. ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकाचे योगदान महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी, चांगले आरोग्य, शिक्षण, घरे, शौचालय, वीज, गॅस आदि सुविधा केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेण्याचे आवाहन केले. स्वच्छतेसाठी गावात शोषखड्डे आवश्यक आहे. त्यानुसार अधिकाधिक प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिया म्हणाले, जळगाव जिल्ह्यात 400 गावे हागणदारीमुक्त झाली आहे. आता डासमुक्त जळगाव अभियान पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील 5 गावात असे एकूण 75 गावात राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, चांगल्या कामातून इतरांना प्रेरणा मिळत असल्याने प्रत्येकाने अधिकाधिक चांगले काम करावे. यापुढे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दरवर्षी वितरीत होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, राज्याध्यक्ष श्री. निकम, पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक अविनाश पाटील, सौ. सविता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील सन 2014-15 ते 2016-17 या कालावधीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थीना शाल, सन्मापत्र, सन्माचिन्ह, साडी व ड्रेसचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या ग्रामसेवकांचा झाला सत्कार
सन 2014-15 मधील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार श्रीमती शितल नथ्यु पाटील, (अमळनेर), श्री. विकास भिमराव पाटील, (भडगांव), श्री. गणेश तुकाराम सुरवाडकर, (भुसावळ), श्री. दिनेश मांगा वळवी, (बोदवड), श्री. दिपक मोरेश्वर जोशी, (चोपडा), श्री. हरीभाऊ शंकर पाटे, (चाळीसगांव), श्री. प्रल्हाद नारायण पाटील, (एरंडोल), श्रीमती प्रतिभा यशवंत पाटील, (जामनेर), श्री. रविद्र दत्तात्रय चौधरी, (पाचोरा), श्री ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, (पाचोरा), श्री. रविंद्र कडू नागरुद, (मुक्ताई नगर), श्री. देविदास धनराज पाटील, (रावेर), श्री. सुनिल नामदेव फिरके, (यावल).
सन 2015-16 साठीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार श्रीमती. कविता नवल साळुंखे, (अमळनेर), श्री. भिला काशिनाथ बोरसे, (भडगांव), श्री. गोंविद हिरासिंग राठोड, (भुसावळ), श्री. पंढरीनाथ तुकाराम झोपे, (बोदवड), श्री. नंदकिशोर भालचंद्र सोनवणे, (चोपडा), श्री. दिलीप सोमा अहिरे, (चाळीसगांव), श्री. नारायण सजन माळी, (एरंडोल), श्री. संदिप पांडुरंग महाजन, (धरणगाव), श्रीमती रुपाली मधुकर साळुंखे, (जळगाव), श्री. भास्कर पुंडलिक महाजन, (जामनेर), श्री अविनाश देविदास पाटील, (पाचोरा), श्री नरेंद्र साहेबराव सांळूखे, (पारोळा), श्री. मनोहर नारायण चौधरी, (मुक्ताई नगर), श्री. कुंदन उत्तम कुमावत, (रावेर), श्री. संजिव सुरेश चौधरी, (यावल).
सन 2016-17 साठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार श्री. राजेश नामदेव पाटील (अमळनेर), श्री. शरद शांताराम पाटील (भडगांव), श्री. पंकज अरुण चौधरी (भुसावळ), श्री. चिंतामण रणजीत राठोड (बोदवड), श्री. मधुकर लोटन चौधरी (चोपडा), श्रीमती सविता रंगनाथ पांडे (चाळीसगांव), श्री. रमेश मधुकर पवार (एरंडोल), श्री. अनिल भास्कर पाटील (धरणगांव), श्री. उल्हासराव प्रकाशराव जाधव (जळगांव), श्री. गोंविदा नामदेव काळे (जामनेर), श्रीमती. स्वाती दामोदर पाटील (पाचोरा), श्रीमती प्रिती प्रल्हाद जढाल (मुक्ताईनगर), श्री. रुबाब महोम्मद तडवी (यावल) यांना देण्यात आला.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\