मुंबई, दि. ८ : सर ज. जी. कला महाविद्यालयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीचे पेंटिंग, मातीकाम, धातूकाम, अंतर्गत गृह सजावट, शिल्पकला, वस्त्रसंकल्प व कला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गत वर्षभरात तयार केलेल्या कलाकृतींमधील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन १४ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत संस्थेच्या कला दालनामध्ये भरविण्यात येणार आहे. कला रसिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. वि. डों. साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यानिमित्त १६ मार्च २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. कला प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. साबळे यांनी केले आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377