पाचोरा- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या सौ.वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पाचोरा शहरातील शिवतीर्थ कार्यालय येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. प्रथमतः दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पाचोरा व पंचकोशीतील लोकांसाठी सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सुमारे 360 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ.जॅकी शेख,डॉ. विष्णू पाटील व त्यांचे सहकारी डॉ. विनोद पाटील यांच्याकडून करून घेतली.त्यातील जवळपास 69 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले.रुग्णांची तपासणी,जळगाव येथे येण्या – जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सौ. वैशाली सुर्यवंशी करीत आहेत.
याप्रसंगी मा.दिपकसिंग राजपूत (जिल्हाप्रमुख), श्री.रमेशजी बाफ़ना (ता.प्र.शेतकरीसेना), श्री.अरुण पाटील (शेतकरीनेता), शरद पाटील (तालुका अध्यक्ष), तिलोतमा (जिल्हा संघटिका), जयश्री वाणी, मंदाकिनी पारोचे, भरत खंडेलवाल, श्री.दत्ताभाऊ जडे (मा. नगर सेवक), श्री.संदीप जैन (उपजिल्हाप्रमुख,युवासेना), श्री.भुपेश सोमवंशी (तालुका प्रमुख,युवासेना), श्री.अजय पाटील (एस.टी.कामगारसेना ता.प्रमुख,पाचोरा), श्री.हरीश देवरे (शहर प्रमुख,युवासेना), सौ.जयश्री येवले (शहर संघटिका महिला आघाडी), सौ.कुंदन पण्ड्या (शहर संघटिका), सौ.मंदाकिनी पारोचे (शहर समन्वयिका,पाचोरा), श्री.पप्पू दादा राजपूत, बंडू पाटील, राजू साळुंके, फकिरा पाटील, कुंदन पाटील, चैतन्य राजपूत, किरण पाटील, प्रशांत सोनार, नाना, धर्म काका पाटील, शुभम राजपूत, श्री.अतुल चौधरी, आदि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377