महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत जळगावात 24 ते 26 मार्च दरम्यान नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजन

जळगाव, दि.16 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यामार्फत शुक्रवार, 24 मार्च 2023 पासून बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 24 ते 26 मार्च, 2023 दरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत याशोदाई हॉल, रिंग रोड, जळगाव येथे होईल.
याठिकाणी नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये pmfme अंतर्गत व इतर योजनांमधील गटांना स्टॉल देण्यात येतील. प्रदर्शनात खान्देशी मसाले, विविध प्रकारचे तांदूळ, पापड, नागली पापड, बिबड्या, कुरड्या, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, गारमेंट, हस्तकला वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तृणधान्याचे महत्व सर्वसामान्यांना कळावे यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणीयुक्त पदार्थ, राजगिरा यांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात येणार आहे. प्रदर्शनात आरोग्य विषयक माहिती सुद्धा देण्यात येणार असून सांस्कृतिक व जाणीव जागृतीचे कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी प्रदर्शन स्थळी भेट देवून बचत गटामार्फत निर्मित शुद्ध व दर्जेदार वस्तु खरेदीचा आनंद घ्यावा. असे आवाहन माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री उल्हास पाटील यांनी केले आहे. प्रदर्शनामध्ये स्टॉल नोंदणी करिता युवराज पाटील सहा.सनियंत्रण अधिकारी माविम -९८९०५३७७१८ यांच्याशी संपर्क साधावा.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



