आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
क्रीडा व मनोरंजन
Trending

पुणे, मुंबई शहर छत्रपती शिवाजी महाराज चषकाचे मानकरी. यंदाच्या वर्षातील दोन्ही संघाचे हे तिसरे जेतेपद.

         

२१वी छत्रपती शिवाजी महाराज वरिष्ठ गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा – जळगांव – २०२३.

जळगांव :-  पुण्याने महिलांत , तर मुंबई शहरने पुरुषांत “२१व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक” कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दोन्ही संघांनी या वर्षात “हॅट्रिक” साजरी केली. अहमदनगर येथे झालेली ७०वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, बारामती-पुणे येथे झालेली मिनी ऑलम्पिक आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चषक हे तिसरे जेतेपद. जळगांव येथील सागर पार्क मैदानातील मॅट वर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा प्रतिकार ३७-२८ असा मोडून काढत रोख रु. एक लाख पन्नास हजार(₹१,५०,०००/-) व छत्रपती शिवाजी महाराज चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या उपनगरला चषक व रोख रु. एक लाख (₹१,००,०००/-) वर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात लोण देत २०-१६ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत ९गुणांच्या फरकाने आपला विजय साकारला. निकिता पडवळ, आम्रपाली गलांडे यांच्या संयमी चढाया, त्याला साक्षी गावडे, पूजा शेलार यांनी उत्कृष्ट पकडी करीत दिलेली मोलाची साथ यामुळे पुण्याला हे शक्य झाले. उपनगरच्या हरजित कौर संधू हिला अन्य खेळाडूंची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्यांच्या शुभदा खोत, प्रणाली नागदेवता यांचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. 

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने अहमदनगरचे आव्हान २८-२५ असे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज चषक व रोख रु. एक लाख पन्नास हजार(₹१,५०,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या अहमदनगरला चषक व रोख रु. एक लाख(₹१,००,०००/-)वर समाधान मानावे लागले. मुंबईने नाणेफेक जिंकत मैदानाची निवड केली. नगरने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटात आघाडी घेतली. पण त्याने विचलित न होता मुंबईने पहिल्या सत्रातच २लोण नोंदवित २१-०८ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मात्र सावध खेळ करण्याच्या नादात बेसावध रहाणाऱ्या मुंबईवर नगरने एक लोण देत आपली  आघाडी कमी केली. पुन्हा काही गुण घेत आघाडी एका गुणापर्यंत खाली आणली. नंतर मात्र अतिशय संयमाने खेळ करीत ३ गुणांनी मुंबईने विजेतेपदाचा चषक उंचावला. प्रणय राणे, अक्षय सोनी, सुशांत साईल यांच्या चतुरस्त्र चढाया, तर संकेत सावंत, हर्ष लाड यांच्या भक्कम पकडी या मुळे मुंबईने विजय साकारला. शिवम पठारे, तुळशीदास वायकर यांनी अहमदनगरकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!