काकनबर्डी येथील खंडोबा मंदिर परिसराचा होणार कायापालट ; पर्यटन विकासासाठी पाच कोटींना मान्यता आ. किशोर अप्पा पाटील
पाचोरा दि,४ – पाचोरा भडगाव मतदार संघात विकास कामांची प्रगती मजल दरमजल सुरू असतांनाच मूलभूत सुविधे पाठोपाठ आता पर्यटन विकासात देखील आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने भर पडत असून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाचोरा गिरड मार्गावरील प्रसिद्ध अशा काकनबर्डी येथील खंडोबा मंदिराच्या पर्यटन विकासासाठी देखील आता तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दि. २९ मार्च २०२३ रोजी याबाबतचा शासन आदेशा निर्गमित केला आहे.प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राज्यभरात सुमारे ४१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यात याचा समावेश आहे.
या निधीतून मंदिर परिसर सुशिभिकरणासह अनेक सुविधा पर्यटकांसाठी निर्माण केल्या जाणार आहेत यामुळे परिसरातील नागरिकांसह भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.दरम्यान पाचोरा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील तसेच ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.
पर्यटन विकासात पाचोरा मतदारसंघ ठरतोय अव्वल !
पाचोरा मतदार संघात पाचोरा व भडगाव तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणांना पर्यटन विकासातून चालना देऊन पाचोरा भडगाव मतदारसंघातील पर्यटनाचा टक्का वाढवा यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने बहुळा धरण अर्थात कृष्णा सागर पार्क परिसर विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी आणली असून प्रत्यक्ष कामांना सुरुवात देखील झाली आहे.शिवाय तेथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बहुळा धरणाच्या जलाशयात मध्यभागी कृष्ण भगवान यांच्या भव्य मूर्तीसह कारंजे,बोटिंग, गार्डन, फुडपार्क आदी गोष्टी साकारणार असून त्यासाठी देखील लागणाऱ्या वाढीव निधीचा पाठपुरावा सुरू आहे.तसेच पाचोरा शहराची प्राचीन ओळख असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिर परिसर विकासासाठी १० कोटी रुपयांना मंजुरी आणली असून येथे देखील मंदिराला दुतर्फा वळसा घालून आलेल्या नदी पात्रात घाट ,बोटिंग, गार्डन ,गो शाळा तसेच अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या धर्तीवर पाचोऱ्यातील या ऐतिहासिक ठेव्याची देखील जपणूक करत प्रभू रामचंद्राचे मंदिर पूर्णबांधणी तसेच संपूर्ण परिसर पर्यटन विकासाच्या दृष्टीने देखणा करण्यासाठी कामाची सज्जता सुरू झाली आहे.सोबतच भडगाव शहरातील तळणी परिसराला देखील पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. यासाठी देखील पाच कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. यातून भडगाव शहरातील नागरिकांना सहकुटुंब एकदिवसीय पर्यटनाला जाण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रतिक्रिया
आपल्या मतदार संघातील नागरिकांना सहकुटुंब विरंगुळा म्हणून जाण्यासाठी जवळपास एकही ठिकाण नाही म्हणून पर्यटन विकासातून आपल्या जनतेला सुविधा मिळावी यासाठी पाचोऱ्यातील प्राचीन प्रभू रामचंद्र मंदिर परिसर विकासासाठी १० कोटी, कृष्णा सागर पार्क (बहुळा धरण) परिसर विकासासाठी ५ कोटी, भडगाव शहरातील तळणी परिसर विकासासाठी ५ कोटी तर आता काकनबर्डी येथील खंडोबा महाराज यांच्या मंदिर परिसर पर्यटन विकासातुन विकसित करण्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. किशोरअप्पा पाटील – आमदार पाचोरा- भडगाव
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377