आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा पीपल्स बँकेचा नोकर भरतीचा मार्ग मोकळा ?

पाचोरा, दि.16– आज दि 16 मे रोजी पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन श्री अतुल संघवी यांनी पत्रकार घेऊन बँकेचा लेखजोखा मांडत पुफ्हील काळात होणाऱ्या नोकर भरती संदर्भात माहिती देताना पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत माहिती सांगितली बँकेच्या ठेवीत रुपये 102.45 लाखाने वाढ झालेली असुन 31 मार्च 2023 अखेर बँकेच्या एकुण ठेवी 13070.37 लाख इतक्या आहेत. अहवाल वर्षात रुपये 894.94 लाखाची जुनी थकीत कर्जाची वसुली झाली.बँकेची एकुण थकीत कर्जे येणे बाकी रुपये 1023.38 लाख असुन येणे कर्ज बाकीशी शेकडा प्रमाण 15.36 टवके इतके असुन निव्वळ एन.पी.ए चे प्रमाण 0% टवके इतके आहे.

सन 2022-23 या वर्षात बँकेच्या व्यवहारात वाढ झालेली असुन दि.31 मार्च 2023 अखेर खेळते भांडवल रु.17120.76 लाख आहे. बँकेच्या दि.31 मार्च 2023 रोजी भांडवल पर्याप्तता निधीचे प्रमाण 29.60 टक्के इतके राखले आहे. बँकेचा करपुर्व एकुण नफा रु.478.04 लाख असुन उत्पन्नातुन प्रत्यक्ष खर्च, कायम मालमत्तेवरील घसारा, सहकार कायदा व टनियमानुसार कराव्या लागणा-या तरतुदी बँकेने पुर्ण करुन बँकेला आयकर वजा जाता रुपये 60.24 लाख इतका नफा झाला आहे.

बँकेचे संचालक मंडळ अस्तित्वात आले त्यावेळी बँकेतील कर्मचा-यावरील पगारावरील वार्षीक खर्च सुमारे रु.2.25 कोटी इतका होता तो मार्च 2023 अखेर रु.1.20 कोटी म्हणजेचा सुमारे 1.05 कोटी प्रती वर्ष एवढ्याने कमी झालेला आहे.

संचालक मंडळाने पदभार स्विकारतांना कर्मचारी भरती करण्याचे नियोजन केले होते. परंतु महाराष्ट्र शासनाचे जी.आर.व रिझर्व्ह बँकेचे नियम या नुसार नवीन भरती करणे शक्य होत नव्हते त्यामुळे मागील संचालक मंडळाने ठरविले प्रमाणे करार पध्दतीवर आवश्यक तेवढे कर्मचारी उपलब्ध करुन घेतलेत.तथापि यापुर्वी बँकेत विना करार, विना आदेश असलेले सर्व कर्मचारी बँकेने बंद केलेले आहे व करारावर भरलेल्या कर्मचा-यांना मानधनावर एकसुत्रता आणलेली आहे. सन 2022-23 या आर्थीक वर्षाचा नफा, खेळते भांडवल व कर्मचारी संख्या पाहता बँकेला आता कर्मचारी भरती शक्य झालेले आहे.

बँकेचे मार्गदर्शक सभासद श्री संदीप महाजन यांनी दिलेल्या बँकेला पत्रानुसार बँकेने संचालक मंडळाचे सभेत कर्मचारी भरतीचा निर्णय घेतलेला आहे. बँकेची कर्मचारी भरती ही राज्य शासनाचे धोरणानुसार 100 टक्के पार पाडली जाईल. व तदनंतर बँकेत करारस्वरुपी एकही कर्मचारी नसेल. या बाबत चेअरमन यांनी खात्री दिली. सर्व कर्मचारी भरती ही येत्या 4/5 महिन्यात सर्व प्रक्रीया पार पाडण्यात येईल.

बँकेने कर्ज वसुलीचे कडक व सर्वांसाठी समान धोरण अवलंबलेले आहे. तसेच बँकेच्या सर्व सभासदांचे सहकार्य लाभल्याने बँकेने 0% एन.पी.ए. चे उद्दीष्ट्ये गाठलेले आहे.बँक येणा-या तीन महिन्यात API TO API, R.T.G.S., A.T.M उभारणी व इतर डिजीटीलायझेशन पुर्ण करेन असे संचालक मंडळास खात्री आहे.

आपण सर्व पत्रकार बंधु हे बँकेच्या प्रगतीत सतत सहकार्याची भूमीका पार पाडत असतात व बँकेचे ध्येय धोरण बँकेचे ग्राहका पर्यंत पोहचवित असतात बँक त्या बद्दल ऋणी व आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!