
पाचोरा, दि 18 – कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड दिनांक 22मे रोजी होणार असून बाळासाहेबांची शिवसेना आमदार किशोरआप्पा पाटील यांचे पॅनलचे नऊ सदस्य तर महाविकास आघाडीचे सात सदस्य आणि उर्वरित दोन अमोल शिंदे (भाजपा) गटातील सदस्य असे एकूण बलाबल असले तरी सभापती पदासाठी आवश्यक असलेली एक जागा कमी पडत असल्याने शिवसेना ह्या सभापती निवडी प्रसंगी काय खेळी करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते त्याच दृष्टिकोनातून पाऊल टाकत कृ.ऊ.बा.स. वर निवडून आलेले सदस्य श्री उद्धव मराठे यांच्या मागील कार्यकाळातील झालेल्या अतिरिक्त खर्चाबाबतची कलम 40 अंतर्गत तक्रारीतील सुनावणी असल्याचे हेरून, त्यांच्या विरुद्ध जी तक्रार दाखल केली गेली होती त्याची सुनावणी दिनांक 18 मे रोजी झाली परंतु महाविकास आघाडी तर्फे हायकोर्टाकडून दोन आठवड्यांसाठी वेळ देण्याबाबत स्टे ऑर्डर मिळालेली होती असे असताना आज रोजीच्या सुनावणीमध्ये पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 मे रोजी उद्धव मराठे यांच्या बाबतची सुनावणी ठेवण्यात आली आहे यामुळे महाविकास आघाडी पॅनल मध्ये प्रचंड नाराजी जरी झाली असली तरी या राजकीय खेळात असे डावपेच केले जात असतातच. किंबहूना उद्धव मराठे हे देखील राजकीय वजन राखून असलेले व्यक्तीमत्व असून त्यांना कोणी ज्ञात – अज्ञात संकटमोचक या वेळी मदत करेल का किंवा ते स्वतः या कारवाईला सामोरे न जाता आपले सदस्यत्व वाचविण्यात काही निर्णयाअंती यशस्वी होतील का हे वेळच ठरविणार आहे.
संबंधित उपनिबंधक यांच्यावर महाविकास आघाडी तर्फे नाराजी चे स्वर उमटत असले तरी सहकारातील या कारवाईकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे उपनिबंधक यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे असल्याचे स्पष्ट होत असून कोर्टाच्या स्टे ऑर्डरलाही त्यांनी थारा दिली नाही का प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे जर उद्धव मराठे यांचे जैसे थे वैसे सदस्यत्व 22 मे रोजी राहिले व भाजप मधील शिंदे गटातील दोन सदस्य आणि महाविकास आघाडीचे सात सदस्य असे नऊ व शिवसेना शिंदे गटातील नऊ ही लढत रंगली तर मात्र ईश्वरी कृपेशिवाय कोणालाही सभापतीपद मिळणार नाही हे मात्र इथे स्पष्ट चित्र आपल्याला पहावयास मिळणार आहे
कोर्टाकडून मिळालेल्या स्टे ऑर्डर बाबत व सलग सुनावणी ठेवल्याबाबतची विचारणा वैशालीताई सूर्यवंशी यांना केले असता त्यांनी सदर लोकसेवक हे आपले कर्तव्य पार पाडण्यात सत्ताधारी यांना मदत होईल अशी काही भूमिका घेत असल्याचे चित्र जाणवत असून आमचा अशा प्रवृत्तींना विरोध आहे वेळप्रसंगी याबाबत आम्ही योग्य तो न्याय मिळवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर शिवाय न्यायालयात दाद मागू परंतु राजकारणात अशाप्रकारे खेळी करणे हे खऱ्या लोकशाहीचे लक्षण नसून ही दडपडशाही असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसते आहे.
आमदारांचे कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अपात्रता प्रकरणात मे. उच्च न्यायालयाने स्थगीती दिलेली असतांनाही तातडीने नोटीस काढुन तडकाफडकी आमच्या पॅनलचे उमेदवार श्री. उद्धव मराठे यांना अपात्र घोषीत करण्यासाठी सलगच्या व जवळच्या तारखा देवुन पक्षपात करीत आहेत. अपात्रता अर्जावर पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा अवधी न देता घाईघाईत सलगच्या तारखा देवुन जिल्हा उपनिबंधक यांनी आपली सत्ताधयांशी असलेली बांधीलकी जगाला दाखवुन दिलेली आहे.नैसर्गीक न्याय तत्वाने न वागणाया जळगाव जिल्हा सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक श्री. बिडवाई यांचा जाहीर निषेध आम्ही करीत आहोत – सौ. वैशालीताई सुर्यवंशी



