जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आकाशवाणीवरुन साधणार संवाद

जळगाव,दि.3 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 5 जून, 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन ‘वनवार्ता’ या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत.
“वनवार्ता”या कार्यक्रमातून वनमंत्री श्री. मुनगंटीवार हे वनांविषयी कुतूहल, गमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मनोगत व्यक्त करणार आहेत. 5 जून, 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून हा कार्यक्रम 15 मिनिटांचा असेल असे भरत शिंदे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



