आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा कन्या विद्यालयात श्रीमंत बाळासाहेब पवारांना आदरांजली

पाचोरा – नगरदेवळा संस्थांचे जहागीरदार तथा येथील माणिकराजे पवार आणि विश्वासराव पवार शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्रीमंत सरदार बाळासाहेब कृष्णराव शिवराव पवार यांना त्यांच्या 19 व्या पुण्यतीथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 2 जून 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात श्रीमंत सरदार स्व. बाळासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, विश्वस्त प्रा.रवींद्र चव्हाण तसेच सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण केली.प्राचार्य संजय पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, प्रा. शिवाजी शिंदे, प्रतिभा परदेशी, प्रा. संगीता राजपूत यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेबांच्या स्मृतीला उजळा दिला. याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रा. प्रतिभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप पाटील सर यांनी आभार प्रकटन केले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!