जळगाव व पाचोरा येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ९२३ किलो भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त, ४.३६ लाखांचा मुद्देमाल

जळगाव व पाचोरा येथे सणासुदीचे मोहिमे अंतर्गत मोठी कारवाई अजून अनेक भेसळखोरांचे बुरखे फाटणार
भेसळखोरांची दुकाने व नाव,गाव फोटो सहीत माहिती ही लोकांन पर्यंत पोहचावी जेणेकरून नागरिक बनावट खाद्य पदार्थ विकत घेणार नाहीत यासाठी आता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे
जळगाव,15 सप्टेंबर – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाकडून जिल्हाभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दि. १०.०९.२०२६ रोजी जळगाव शहरातील अग्रवाल वेफर्स व नमकीन या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत गुजरात येथून आणलेले Proprietary Food जे दिसायला खवा व बर्फी सारखे आहे, परंतु मिठाई विक्रेत्यांना दुधापासून बनविलेले पेढे व बर्फी म्हणून विक्री केले जात होते, असा एकूण ३७० किलो किंमत रु. ९३,०२०/- चा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणाच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचोरा येथे दोन मिठाई विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. तेथे proprietary food वापरून दुधापासून तयार केलेले पेढे विकले जात असल्याच्या संशयावरून अन्न नमुने घेण्यात आले असून रु. २,५००/- चा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.
तसेच पाचोरा येथेच क्रीम व त्यापासून बनविण्यात येणारे तूप या अन्न पदार्थांची संशयावरून तपासणी करण्यात आली. यात १७४.२ किलो तूप (किंमत रु. १,३२,३९२/-) आणि ३७९.२ किलो क्रीम (किंमत रु. २,०८,५६०/-) जप्त करण्यात आले.
एकूण कारवाईत ९२३.४ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत ४,३६,२२२/- रुपये आहे. जप्त केलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



