
पाचोरा- येथील संघवी कॉलनी, भागातील रहिवासी सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक यादव विठ्ठल सिनकर यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे रविवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी ‘कुसुम सभागृह’ नांदेड, येथे महापौर श्रीमती कविताताई मुळे यांच्या हस्ते समारंभ पूर्वक यादव सिनकर यांना “राष्ट्रीय शिक्षक रत्न नगरी पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत, परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष गिरीशभाऊ जाधव, डॉ. नागेश कल्याणकर ( कल्याणकर कोचिंग क्लासेस ), गोपीनाथ सगर, परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, मार्गदर्शक गुणवंत पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य असलेले यादव विठ्ठल सिनकर यांनी सुमारे 39 वर्ष शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत सेवा बजावली आहे. श्री गणेश मेडिकलचे संचालक व पाचोरा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. यादव सिनकर यांना वयाच्या 78 व्या वर्षी मिळालेला हा राष्ट्रीय स्तर पुरस्कार त्यांच्या स्वतःसाठी व युवा शिक्षकांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. समाजाच्या विविध थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



