डाक जीवन विम्याच्या खंडित झालेल्या पॉलीसीच्या पुनर्जीवन रक्कमेवर सुट

जळगाव, दि.6 :– भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल विमाच्या मागील खंडित झालेल्या पॉलीसीच्या पुनर्जीवन रकमेवर १ जून ते ३१ ऑगस्ट, २०२३ दरम्यान सूट देण्यात आली आहे. खंडित झालेल्या PLI-RPLI पॉलीसीच्या पुनर्जीवन हप्त्याची मिळणारी १ लाख रक्कमेपर्यंत दंडाच्या रक्कमेवर २५% सूट तर जास्तीत जास्त सूट/माफीच्या रक्कमेची मर्यादा २५०० रुपये आहे. १ लाख ते ३ लाख रक्कमेपयंत दंडाच्या रक्कमेवर २५% सूट असून जास्तीत जास्त सूट/माफीच्या रक्कमेची मर्यादा ३ हजार रुपये इतकी आहे. तर ३ लाख ते पुढील रक्कमेवर दंडाच्या रक्कमेवर २५% सूट असून जास्तीत जास्त सूट/माफीच्या रक्कमेची मर्यादा ३५०० इतकी असून ही रक्कम GST सोडून आहे. वरीलप्रमाणे सूट ही फक्त मागील खंडित झालेल्या PLI-RPLI पॉलीसीच्या पुनर्जीवन रक्कमेवर १ ते ३१ ऑगस्ट, २०२३ दरम्यान असून या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



