पाचोरा – येथील टायगर किड्स या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शितल अकॅडमी चे संचालक प्रा. रोहन पाटील यांना मलेशिया येथील “टेलर्स युनिव्हर्सिटी” तर्फे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन एज्युकेशन ही पदवी बहाल करण्यात आली. दिनांक 16 जुलै 2013 रोजी बँकॉक येथे झालेल्या जे.डब्ल्यू. मेरीयट या सप्त तारांकित हॉटेलमध्ये भारताचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रा. रोहन पाटील यांना ही डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
याप्रसंगी टेलर्स युनिव्हर्सिटी च्या भारतीय प्रतिनिधी, तथा समन्वयक कुमारी जीविका पी. राजू, गायक अभिजीत सावंत (मुंबई)अक्षय आहुजा ( संस्थापक -रोबोचैंप्स ,नवी दिल्ली) यांचे सह जगभरातील 50 देशांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ञ व शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि संस्था उपस्थित होत्या.
प्रा. रोहन पाटील यांनी पुणे विद्यापीठातून एम ए (इंग्लिश) व बी.एड. चे शिक्षण घेतले असून मागील 12 वर्षापासून ते शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. “टायगर किड्स” ही पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमाची संस्था त्यांनी स्थापन केली असून देशभरात या संस्थेच्या 13 फ्रेंचाईसी आहेत. दिल्ली येथील इंटरनॅशनल स्कूल अवार्ड या संस्थेतर्फे त्यांची आंतरराष्ट्रीय टेलर्स युनिव्हर्सिटी च्या डॉक्टरेट पदवीसाठी निवड करण्यात आली होती. “शैक्षणिक अभ्यासक्रम आणि शिक्षण कार्यपद्धती”- यावर प्रकाशझोत टाकणारा “डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन एज्युकेशन” या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. बँकॉक येथे झालेल्या पदवी प्रदान समारंभात महाराष्ट्रातील 2 तर जगभरातील 50 प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रा. रोहन पाटील यांच्या या यशाबद्दल पाचोरा व जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377