पाचोरा, दि 28 :- पाचोरा नगर परिषदेचे गाळा विक्री प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंण्ड पिठ औरंगाबाद यांचेकडे रिट याचीका क. ५९९५/२०२२ ही याचीका चंद्रकांत मुरलीधर येवले व इतर यांनी दाखल करून गाळे लिलाव प्रकरणी याचीका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दि. २६/०७/२०२३ रोजी मुख्याधिकारी सो, पाचोरा नगर परिषद यांना दि. २३/०८/२०२३ पावेतो शपथपत्र दाखल करण्याचे आदेशीत केलेले आहे. त्यामुळे व्यापा-यांमध्ये खळबळ माजली आहे.
गाळा लिलाव प्रकरणी मे. न्यायालयाने याचिका प्रलंबीत असतांना त्यांचे निर्देशनास आले की, न.पा.चे शपथपत्रात रेकॉर्डनुसार नापरतावा हे दर्शविण्यात आले ही तफावत न्यायालयाच्या निदर्शनास आली व जाहीरात प्रसिध्द करतांना ना परतावा रक्कमे संदर्भात उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु लिलाव झाल्यानंतर ना परतावा रकमेसंदर्भात बोलीधारकांकडुन बोली झालेल्या रकमेची मागणी करण्यात आली म्हणुन चंद्रकांत मुरलीधर येवले वगैरे यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नगरपालिकेच्या बेकायदेशिर कृतीस याचीकेद्वारे आव्हानीत केले. सदर प्रकरण हे उच्च न्यायालयात दि. २६/०७/२०२३ रोजी तातडीची सुनावणी म्हणुन चौकशीला आले, त्यात मुख्याधिकारी यांना शपथपत्र सादर करण्याचे आदेशित करण्यात आले व दि. २३/०८/२०२३ पावेतो स्पष्ट शपथपत्र दाखल करण्या बाबत निर्देश दिलेत सदर प्रकरण हे तातडीने सुनावणी दि. २३/०८/२०२३ रोजी ठेवण्यात आली.न्यायालयाने व्यापारी संकुलातील संबधीत न्यायालयातील याचिकेतील गाळे संदर्भात फेरलिलाव करता येणार नाही असे आदेशीत केले आहे.
मे. न्यायालयाने फेरलिलावा बाबत स्थगीती दिली असल्यामुळे ज्यांनी न्यायालयात प्रलंबीत वादातील गाळे संदर्भात नगर परिषदेकडुन गाळे फ़ेरलिलावाने घेतले आहेत. ते गाळे धारक यांचे गाळे हे न्यायालयाने स्थगीत केलेले असल्याने व्यापा-यांमध्ये मोठी खळबळ उडालेले आहे
याबाबतीत व्यापा-यांमध्ये अन्य फेरलिलावात घोटाळा झाल्याबाबत चर्चेला उधान आलेले आहे, ज्यांनी गाळे घेतलेले आहेत त्यांचे पैसे बुडीत झालेले आहे अशी चर्चेला उधान आले आहे. यापुर्वी वर्तमान पत्रात देखील सावळा गोधाळा बाबत बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. वर्तनाम पत्रातील बातमी ही सत्य आहेत अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे.
याकामी मे. उच्च न्यायालयात चंद्रकांत मुरलीधर येवले वगैरे यांच्या वतीने अॅडव्होकट विजय बी.पाटील औरंगाबाद यांनी काम काज केले व त्यांना अॅड. एस.ए.सैदाणे पाचोरा यांनी सहाकार्य केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377