तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे ,नूतन मराठा महाविद्यालयातील युवकांशी संवाद
जळगाव,दि.२ ऑगस्ट – महसूल विभागात पारंपरिक पध्दतीने चालणारे कामकाज आता कालबाह्य झाले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभागाच्या सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होत गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहचत आहेत. असे प्रतिपादन नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
महसूल सप्ताहात युवा संवाद उपक्रमात त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नूतन मराठाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
श्री.गमे म्हणाले की, महसूल विभागाच्या सेवा ऑनलाईन होत आहेत. यामुळे नागरिकांना आता तलाठी, तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. महाभूमि अभिलेख संकेतस्थळावर काही सेकंदात डिजिटल सातबारा डाउनलोड करता येतो. सातबारामधील किलष्ट बाबी वगळून तो सर्वसामान्यांना समजेल असा भाषेत तयार करण्यात आला आहे.
महसूलविषयक ऑनलाईन सेवांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा महसूल सप्ताहाचा मुख्य आहे.असे श्री. गमे यांनी सांगितले.
यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांची या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377