पाळधी ग्रामपंचायतीत पालकमंत्र्यांच्या हस्ते शिलाफलक अनावरण-ग्रामस्थांनी घेतली पंच प्रण प्रतिज्ञा
जळगाव,दि.10.ऑगस्ट – केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार “मेरी माटी मेरा देश” जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने केले आहे. त्या अनुषंगाने पाळधी बुद्रुक आणि पाळधी खुर्द ग्रामपंचायतीत स्वतंत्र शिलाफलक उभारण्यात आला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिलाफलकावर पुष्पहार अर्पण करून दिवे लावण्यात आले.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी दिनकर पाठक यांनी उपस्थित ग्रामस्थांना पंच प्रण प्रतिज्ञा दिली. त्यानंतर गावातील माजी सैनिक विजय सपकाळे, सचिन महाले, विजय चव्हाण, रायभान नन्नवरे, मोहन सूर्यवंशी यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ज्या व्यक्तींनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली आहे. त्यांनी बलिदान दिले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. असे यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, धरणगाव पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी कैलास पाटील, विस्तार अधिकारी व्ही.एम.महाजन, योगेंद्र अहिरे, तलाठी प्रशांत पाटील, कोतवाल धनराज भोई, सरपंच लक्ष्मी शरद कोळी, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शेतकी संघाचे सदस्य संजय महाजन, ग्रामपंचायत सदस्य अनिल कासट, अरविंद मानकरी, शरीफ देशपांडे, पवन माळी, अमीन पटेल यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377