पाचोरा न. पा तर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
पाचोरा – भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 10/08/2023 रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध विभागातील अधिकारी / कर्मचारी, महिला, लोकप्रतिनिधी व नागरीक यांच्या उपस्थितीत सायंकाळी 6-30 वाजता मातीचे दिवे प्रज्वलीत करुन (1) भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. (2) गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. (3) देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. (4) भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. (5)देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अशा आशयाची पंचप्राण शपथ घेण्यात आली सदरची शपथ मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखालील उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधिक्षक मराठे साहेब, पोलिस उपनिरीक्षक योगेश गंगे, नायब तहसिलदार रणजित पाटील, विधी अधिकारी भारती निकुंभ, भांडारपाल प्रगती खडसे, वरिष्ठ लिपीक सुधीर पाटील, रमेश भोसले, ललित सोनार, शरद घोडके, प्रकाश गोसावी, प्रकाश पवार, श्याम ढवळे, आ.निरीक्षक घारु,विशाल दिक्षीत, गजानन पाटील, किशोर मराठे संदिप खैरनार, आकाश खैरनार, गोपाल लोहार भागवत पाटील, विलास कुंभार, नरेश आदिवाल, विठ्ठल पाटील, सुरेखा पाटील, कल्पना पवार, यमुना ब्राम्हणे, रुमा खेडकर आदी कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन सी.एन.चौधरी सदर यांनी तर आभार ललित सोनार यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377