आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

कृ.उ.बा.समितीचे संचालक तथा नगरसेवक लखिचंद पाटील व राष्ट्रवादीचे सरचिटणीस जगदीश पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

पाचोरा- पाचोरा -भडगाव मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे खंदे समर्थक विद्यमान कृ.उ.बा.संचालक तथा नगरसेवक लखिचंद पाटील व राष्ट्रवादीचे सरचिटणीस वडजी येथील जगदीश पाटील यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पाचोरा-भडगाव भाजपा नेते अमोल शिंदे,अमोल पाटील,सोमनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहर व ग्रामीण भागांतील शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत आज जामनेर येथे जाहीर प्रवेश केला.या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह मा.आमदार दिलीप वाघ यांना देखील मोठा धक्का मानला जात असून आगामी भडगाव नगरपरिषद व जि.प.आणि पं.स.निवडणुकीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी अमोल शिंदे यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
स्व.बापूजी फाउंडेशनच्या माध्यमातून लखिचंद पाटील यांची भडगाव शहरासह ग्रामीण भागात तरुणांची मोठ्या प्रमाणात साखळी तयार केलेली आहे.तसेच कृ.उ.बा. संचालक व भडगाव नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून देखील ते निवडून आलेले आहेत.त्याव्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रमात देखील लखीचंद पाटील हे अग्रेसर आहेत.लखीचंद पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचे गणित बदलेल असे मानले जात आहे.
तसेच राष्ट्रवादीचे सरचिटणीस जगदीश पाटील यांच्या प्रवेशाने गुडे-वडजी परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असुन जगदीश पाटील यांच्या सारख्या तरुण व सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या चेहऱ्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीला या भागात भविष्यात फायदा होईल असे मानले जात आहे.
यावेळी मा.नगरसेवक श्री.जहांगीर मालचे,शिवसेना उपशहरप्रमुख विनोद राजपुत, युवासेना तालुका संघटक श्री.जितेंद्र पाटील,सुरेश सोनवणे,वसिम शेख,किशोर राजपुत,चेतन राजपुत,मुन्ना परदेशी,हर्षल राजपुत,रघुनंदन पाटील,राहुल ठाकरे,चेतन चौधरी,सचिन पवार,प्रथमेश पाटील,राहुल मालचे,सचिन जाधव,लाला परदेशी,नितेश पाटील,राहुल वैद्य,राहुल कासार,राहुल सोनार,सनी पाटील,लक्ष्मीकांत (भैय्या) पाटील,अमोल पाटील,स्वप्निल पाटील,महेश पाटील,चेतन काळे,चेतन सोनवणे,राहुल सोनार,आकाश पाटील,दिव्येश कासार,संदीप पाटील,खुशाल महाजन,जयेश पाटील,गोरख सोनवणे, रामू पाटील भूषण पाटील,अण्णा पाटील,विजय पाटील,भुरा आप्पा,रावसाहेब पाटील,बबलू पाटील,जितू पाटील या पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांनी देखील यावेळी प्रवेश केला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर पाटील,प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, पाचोरा-भडगाव भाजपा नेते अमोल शिंदे,भाजपा चिटणीस सोमनाथ पाटील,माजी सभापती बन्सीलाल पाटील शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी,अनिल पाटील,समाधान पाटील मुकेश पाटील,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!